Thursday, 29 October 2009

चल ग सई ...कुठ ग बाई? नदीच्या काठावर...गाईच्या गोठ्यात...भुर्क वासरू टुकू टुकू बघतय...तिथे ग बाई चल...


माझ्या लहानपणची कविता. परवाच माझ्या मुलासाठी "बोलकी बालभारती" ही कैसेट लवली होती. त्या वेळी ही कविता ऐकली आणि मन विशन्न झाले.
 
मी स्वतः ह्या कवितांवर आणि गाण्यांवर वाढले. तेवा "गाईचा गोठा" म्हणजे काय, हा प्रष्न कधीच नाही पडला. भुर्क वासरू हे शब्द ऐकल्यावर तो गोंडस आणि निरागस चेहरा लगेच डोळ्या समोर यायचा. तो स्वप्नातला नदीचा काठ कित्येक कणटालवाण्या क्षणांना रसभरीत करून जायचा. त्या शब्दांनी रेखाटलेल्या चित्रांनी त्या कवितांना मानत कायम एक घर दिले आहे.
 
पण आज अस  चित्र कुठल्या मुलाच्या डोळ्या समोर उभे राहिल? तो दिवस दूर नाही जेव्हा माझा मुलगा माला विचारेल - "आई, गोठा म्हणजे काय ग? वासरू कस असत?" The realities of one generation have become the curiosities of the next.
 
माझा मुलगा कोणत्या कवितांवर मोठा होइल? तो कशा प्रकारचे स्वप्न जगेल? आणि ते स्वप्न मला समजू शकेल?
 
त्या कविता ऐकून जाणीव झाली ती कधी न परत येणारया कालाची. अवती-भवति होत असलेल्या प्रचंड बदलाची. संपूर्ण जीवनपध्दती  बदलून जगणारया  माझ्या generation ची.

Am I blessed or cursed to be a part of this generation?